Wednesday, November 2, 2016

उपचार

1.   स्नेहन-
ज्याप्रमाणे दुचाकी, चार चाकी वाहनाला overoilling ची जरुरी असते कारण प्रत्येक सांध्यात वंगण हवे असते अन्यथा घर्षणाने सांधे खराब होतील तसेच आपल्या शरीराचे सांधे नीट राहण्यासाठी अंतर बाह्य वंगणाची जरुरी असते. म्हणून विशिष्ट औषधी तेलाचे स्नेहन आरोग्यधाममध्ये करण्यात येते.2.   स्वेदन
वाहन चालू केल्यावर धूर येतो व जे इंधन जळतच नाही त्याचा कोळसा [carban] इंजिनच्या हेडवर साचून गाडीची कार्य क्षमता कमी करतो तसेच शरीरात पचलेल्या पदार्थाने ताकद येते व न पचलेल्या किंवा शरीराला त्याज्य अन्नाचे मल, मूत्र, घाम ई.स्वरुपात पदार्थ तयार होतात; की जे बाहेर पडणे आवश्यक आहे व ते तसे बाहेर पडत नसल्याने त्याचे रुपांतर व्याधींमध्ये होते म्हणून स्वेदनाने शरीरावरील करोडो रंध्रातून दोष काढून टाकण्याचा प्रयत्न आरोग्यधाममध्ये केला जातो.

3.   संमोहन, रेकी व मेडीटेशन-
जेंव्हा एखादी व्यक्ती वारंवार होणाऱ्या कौटुंबिक, शारीरिक, सामाजिक कलहाने त्रस्त होते तेंव्हा मनाची द्विधा अवस्था येते त्यातून बाहेर पडणे म्हणजे अंतर मनाला मजबूत बनवणे जे आपण समोहनाने आरोग्यधाममध्ये करतो.
4.   योग- प्राणायाम -
योग्य करायला शिकवतो तो योग की ज्यात खाण्या- पिण्याच्या, वेळा, सवयी, प्रमाणव्यक्तीप्रमाणे ते प्रमाणित करण्यात येते. त्यातही जे शरीर, मन व देशाला हितकारक आहे, त्याचा योग शिकवताना वापर करण्याचे मार्गदर्शन केले जाते. आसनं प्राणायामच्या माध्यमातून निरोगी शरीर व मन राखण्यासाठीचा संकल्प दररोज आरोग्यधाममध्ये दिला जातो.

5.   गर्भधारणा पूर्व व गर्भ संस्कार -
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीही म्हण प्रत्यक्षात उतरवण्याचा आरोग्याधामचा प्रयत्न आज यशस्वी होतोय यात शंका नाही. जे शुद्ध बीज ज्या मातीत पेरणार ती मातीही सकस असावी म्हणून जसा शेतकरी प्रयत्न करतो तशीच आज भरपूर दाम्पत्य गर्भधारणा होण्यापूर्वीच स्वतःच्या शरीर व मनाची शुद्धी करून घेण्यासाठी आरोग्यधामची वाटचाल चालू लागलेली आहेत.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतातगर्भातील अभिमन्यूला चक्रव्यूह भेद समजू शकतो तर आजच्या आधुनिक जगात वावरण्याचं सामर्थ्य या पुढच्या पिढीला आलच पाहिजे. शिवाजी जन्माला यावा असे वाटत असेल तर मी जिजाऊ व शहाजी होईन असा संकल्प मनात रुजला पाहिजे तर आणि तरच शिवाजी दिसेल. सुदृढ, सक्षम, संस्कारवान, धाडसी, राष्ट्रभिमानी, संवेदनशील, पराक्रमी संतती हवी अस प्रत्येकाला वाटत फक्त गरज असते एका प्रयत्नाची व आनंद वाटतो असा प्रयत्न करून काही दाम्पत्य आरोग्यधामला भेट देत आहेत.

6.   एक्यूप्रेशर
आपल्या शरीरावर रोग निदान व रोग निवारण्याची शक्ती जन्मजात देवाने दिलेली आहे. तिला जागृत करून समजून घेणे व ते निरंतर राखण्यासाठी संकल्प करून घेण्याचे काम आरोग्यधाममध्ये केले जाते.

7.   आहार
आहार हेच औषध आहे कारण चुकीच्या आहारानेच ९०% आजार होतात.मग काय, केंव्हा, किती, कुठे व कस खायचे याची घोकंपट्टी आरोग्यधामकरून घेते व व्यक्ती व व्याधीनुसार ते प्रमाणित करण्यात येते.

8.   नाडी परिक्षण -
भारत ही आयुर्वेदाची जननी असून ही संस्कृती अगाध आहे याचा प्रत्यय नाडी परिक्षण करताना येतो, म्हणूनच सुक्ष्म आजारापासून भयानक विकारापर्यंत शरीर व मनात असलेली/होणारी आजाराची अवस्था/सुरुवात जाणून घेण्यावर आरोग्यधाममधील तज्ञ वैद्यांचा भर असतो. इथे बाह्य उपचार न करता नाडी परिक्षण करून रोग निदान व मगच उपचार केले जातात.

9.   निवासी निसर्गोपचार[उपचार] -
एखाद्या रुग्णाला आजारातून बाहेर पडण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते जी सामान्यपणे त्याला मिळत नाही व तो हतबल झालेला असतो. आरोग्यधाममध्ये निवासी उपचारात शरीर, मन, बुद्धी, व आत्म्यापर्यंत विचार करून उपचार केले जातात.म्हणूनच सर्दी खोकला ते कर्क रुग्णापर्यंत चे रुग्णआरोग्यधाममध्ये निवासी व अर्ध निवासी उपचार घेताना पाहायला मिळतात.10. पंचगव्य चिकित्सा -
आपल्या भारतीय गो वंशाच्या गाईमध्ये ३३[३३ प्रकारे गाईचा समाजाला उपयोग होतो म्हणून ३३ प्रकारे ] कोटी देवता वास करतात त्याचा प्रत्यय उपचारांमध्ये दिसतो म्हणून भारतीय गोमातेच्याच पाच गव्यांचा वापर करून दुर्धर आजारांपासून व्याधी-मुक्ती मिळते हे आरोग्याधाममध्ये अनुभवायला मिळते.11.  इलेक्ट्रोथेरपी व फ़िजिओथेरपी -
आधुनिक व प्राचीन वैद्यक शास्त्रांचा सांगम घातला तर रुग्ण लवकर बरा होतो असा आरोग्यधामचा अनुभव आहे आणि म्हणूनच शरीरातील निद्रिस्त- पेशी, जखडलेले अवयव, वेदनायुक्त- सांधे, यांना जागृत करणे, संवेदना वाढवणे, विशिष्ट पद्धतीने स्पंदने देणे व त्यासाठी आधुनिक यंत्रणेचा वापर केला जातो. रुग्णाच्या आजाराच्या गरजेनुसार हा आरोग्यधाममधील उपचारातील एक भाग केला जातो.
पारंपारिक फिजिओ थेरपी - भारतीय संस्कृतीची थोरवी परंपरेत दडलेली पुन्हा पुन्हा दिसते, आपल्या स्वयंपाक घरातील विविध साहित्य, विहिरीवरील रहाट, दळण कांडण, ताक करणे, कपडे धुणे, ई लहान लहान उपक्रमातून ते संडास लघवीला बसण्याच्या पद्धती पर्यंत सर्वच फिजिओथेरपी आहे हे सांगायला आरोग्यधामला स्वाभिमान वाटतो.

12.  सुवर्ण प्राशन संस्कार -
सोन्याचे महत्व जसे दागिन्यात आहे तसे ते शरीरातील एक धातू म्हणूनही आहे त्याचे अति सुक्ष्म प्रमाणात बाल वयात प्राशन झाल्यास तल्लख, कुशाग्र व चाणाक्ष बुद्धी होण्यासाठी मदत मिळते म्हणूनच आरोग्यधाममध्ये याचा उपयोग ० ते ६ वयोगटासाठी तिथी नुसार केला जातो.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...