Tuesday, November 1, 2016

अभिप्राय - नरेंद्र प्रभू


०२/११/२०१६


गेली दहा वर्ष मी मधुमेहाने आजारी असून मुंबईमध्ये निक्ष्णात(?) डॉक्टर कडून उपचार करून घेत असूनही रक्तातीला साखरेचं प्रमाण कमी झालेलं नाही. गेले तीन दिवस  आरोग्यधाममध्ये उपचार करून घेतले. तब्यती विषयी सकारात्मक भाव निर्माण झाले. डॉ. रसिका करंबेळकर यांनी केलेले उपचार खासच आहेत. विद्याधर दादांनी शिकवलेला योग आणि प्राणायाम हे सर्व या आधीसुद्धा शिकलो होतो पण योग्य तंत्र इथे शिकवलं गेलं. हे सर्व आचरणात आणून मधुमेहापासून सुटका करून घेणार आहे.  

विशेष बाबा म्हणजे इथला कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर मंडळी खूपच स्नेहपूर्वक वागतात.
धन्यवाद  

नरेंद्र प्रभू
सांताक्रूझ, मुंबई 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...